Lonavala : इंद्रायणी नदीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु असताना भांगरवाडीजवळ नदीपात्र एका अनोळख्या महिलेचा मृतदेह आढळला आहे.

या महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचे स्वेटर, जांभळ्या रंगाचा गळ्यात स्कार्प व काळ्या मण्यांचे मंगळसूत्रर, पायात जोडवी अाहेत. मृतदेह पाण्यात खराब झाल्याने वयाचा अंदाज येत नाही.

  • याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आले अाहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे तपास करत असून वरील वर्णनाची कोणी महिला इतर पोलीस ठाण्यात मिसिंग आहे का? याचा शोध सुरु आहे.

दरम्यान, या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.