Lonavala : सकाळी पावणे सातला जरांगे पाटील पोहोचले लोणावळ्यात, नऊ वाजता होणार जाहीर सभा

एमपीसी न्यूज -मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा (Lonavala) शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होती.

मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे 6.45 वाजले.

 

Pune : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ स्वाक्षरी फलकाचे अनावरण

सकाळी 6 वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले. 9 वाजता त्यांनी (Lonavala) सभा होणार आहे. मात्र सकल मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता.

रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवांचे जल्लोषात स्वागत केले जात होते. सभा स्थळी येणाऱ्या प्रत्येक बांधवाची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, चहाची व्यवस्था केली जात होती. परिसरात अस्वच्छता होऊ नये याकरिता स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली होती.

थंडी जास्त असल्याने ब्लॅकेट देखील वाटप करण्यात आले. सभास्थळी पोवाडा सादर करण्यात आला. त्यामधून समाज जागृती करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मावळात खास बैलगाडी सजवण्यात आली होती. रात्रभर सकल मराठा समाजातील स्वयंसेवक नेमून दिलेल्या ठिकाणी कामे करत होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.