Chinchwad : मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री जंगी स्वागत

एमपीसी न्यूज – मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील काल मध्यरात्री पिंपरी चिंचवड शहरात (Chinchwad )दाखल झाले आहेत. लाखो आंदोलक त्यांच्या सोबत आहेत. हजारोंच्या संख्येने त्यांच्या सोबत गाड्या देखील आहेत.

त्यांना समर्थन देण्यासाठी लाखोंची गर्दी उसळली(Chinchwad )आहे.मनोज जरांगे व आंदोलकांसाठी शहरात ठिकठिकाणी पाणी बॉटल व नाश्ताची सोय करण्यात आली होती.

Maharashtra : राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’

हजारोच्या संख्येने लोक रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे होते. पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका देखील तैनात होत्या . पिंपरी चिंचवड शहरात पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतषबाजी करत मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.