Pune : कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांची भेट

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड गजा मारणे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते (Pune)व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Pune) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे हे उपस्थित होते.

Chinchwad : मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री जंगी स्वागत

गजानन मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे.त्याच्यावर सहा पेक्षा अधिक खुनांचे गुन्हे दाखल आहेत.

गजा मारणे याने निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवार यांची सपत्नीक भेट घेतली. गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे ह्या माजी नगरसेविका आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.