Alandi: चाकण ,आळंदी व राजगुरूनगर परिषद तसेच त्यांचा लगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका करण्याचा विचार

एमपीसीन्यूज -पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Alandi)मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महानगरपालिकांची हद्द वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही.

चाकण नगरपरिषद ,आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर परिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महानगरपालिका निर्माण करणे याबाबत मागणी होत आहे .

सबब चाकण नगरपरिषद आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर (Alandi)परिषद तसेच त्यांच्या परिसर लगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महानगरपालिका करणे शासनाच्या विचाराधीन आहे.

 

त्यास अनुसरून चाकण नगरपरिषद आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर परिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ लोकसंख्या हद्द इ. तपशील घेऊन यांच्या करता एक स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे जिल्हाधिकारी पुणे पुणे महानगर प्रदेश विकास  प्राधिकरण व आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका मुख्याधिकारी चाकण आळंदी व राजगुरुनगर परिषद यांचा अहवाल तेथील स्तरावरून मागून ते त्यांच्या अभिप्रायासह शासनास पाठवण्याचा आदेश उपसचिव महाराष्ट्र शासन प्रियंका कुलकर्णी -छापवाले यांनी दिला आहे.

Pune : कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांची भेट

या संबंधी जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त आयुक्त पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका,आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद पुणे,उप सचिव (नवी 18) नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई ,मुख्याधिकारी चाकण,आळंदी व राजगुरू नगरपरिषद पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

 

काल (दि.24 रोजी )रात्री (इमेल द्वारे) पत्र  मिळाल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी यावेळी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.