Lonavala : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराला दोन मानांकने

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2019 मध्ये उत्तम कामगिरी केल्याबाबत लोणावळा शहराला दोन मानांकने प्राप्त झाली आहेत. यामध्ये कचरामुक्त शहर व दुसरे म्हणजे शहरातील घराघरातील कचरा गोळा करणे, कचर्‍यांची विल्हेवाट लावणे, नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणे, नागरिकांचा सहभाग या सर्व बाबींमध्ये भरघोस कामगिरी केल्याबद्दल मानांकन देण्यात आले आहे.

कचरामुक्त शहर यामध्ये महाराष्ट्रातील 27 शहरांचा तर स्वच्छ शहरे या सदरात महाराष्ट्रातील पाच शहरांना मानांकने देण्यात आली असून यामध्ये लोणावळा शहराचा समावेश करण्यात आला आहे. देश पातळीवर सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराला दोन मानांकने मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • लोणावळेकर नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, प्रशासकिय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी सचिन पवार, आरोग्य समितीचे विद्यमान सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पुजा गायकवाड व ब्रिंदा गणात्रा यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांनी हा लोणावळेकर जनतेचा हा सन्मान असल्याचे घोषित करत लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या स्वच्छ शहर चळवळीत शहरातील नागरिक, विविध संघटना यांनी उस्फूर्त सहभाग घेतल्याने आज लोणावळा शहराला दोन मानांकने मिळाली असून शहर निश्चितपणे पंचतारांकित मानांकन देखिल प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.

  • देशभरातील 4237 शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभाग घेतला होता. या शहरांचे सर्वेक्षण करत 64 लाख नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि 4 कोटी सोशल मिडियावरील प्रतिक्रिया या सर्वांचा विचार करुन केंद्रीय परिक्षण समितीने वरील मानांकने जाहीर केली असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.

येत्या 6 मार्च रोजी दिल्लीमध्ये ही मानांकने शहरी व नागरी स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रिय सचिव दुर्गा शंकर मिश्रा व केंद्रिय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.