Lonavla News : शिवदुर्ग टीम ने केली दुर्गम भागात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुटका

एमपीसी न्यूज – कैवल्यधाम येथील डोंगरावर दुर्गम भागात अडकून पडलेल्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची शिवदुर्ग टीम व लोणावळा शहर पोलिसांनी रविवारी (दि.29) (Lonavla News) सुखरूप सुटका केली आहे.

Chinchwad Bye Election : पोटनिवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; उमेदवारांना दाखल गुन्ह्याची माहिती प्रसिद्ध करावी लागणार

कैवल्यधाम येथे तीन परदेशी व्यक्ती डोंगराकडे फिरायला गेले होते . त्यापैकी दोन जण परत आलेले होते, पण एक मराठी बोलणारे गृहस्थ परत आलेले नाही. रस्ता चुकलेल्या व्यक्तीचा फोन बंद असल्याने कोणताच संपर्क होत नव्हता,अशी माहिती पोलीसांना मिळाली .

लोणावळा शहर पोलिसांनी दुपारी शिवदुर्ग टीमला फोन केला व सांगितले की एक व्यक्ती कैवल्यधाम डोंगर परिसरात रस्ता चुकला आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे. दोन पोलीस कर्मचारी आधीच संबंधीत व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेले होते. राजेंद्र काळे (वय वर्षे 70 ) असे वाट चुकलेल्या नागरिकाचे नाव होते.

माहितीचा डोंगर असल्याने शिवदुर्गची दहा जणांची टीम पोलीस कर्मचाऱ्यासह मोहिमेला सुरुवात केली. गुहेकडे जाणाऱ्या पायवाटेने जात व तिथेच खाली तीव्र उतार असल्याने त्या भागात खाली कोणी घसरले की काय याचाही तपास केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा अपघात झालेला नव्हता, त्यामुळे शिवदुर्ग टीमने त्यांना आवाज देण्यास सुरुवात केली. त्याला काळे यांनी हलका प्रतिसाद दिला.

त्यानुसार ते गुहेच्या खाली डोंगर उतारावर ते असु शकतात व तेच प्रतिसाद देत असतील म्हणून पुढे पुढे सरकत होते . पण त्या खालच्या बाजूला टाटा कंपनीचे गार्डन आहे. त्यामुळे टाटा कंपनीचे मॅनेजर विश्वास राव साहेब यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली व सुरक्षारक्षक वरच्या दिशेने पाठवायला सांगितले.

शिवदुर्ग टीमने त्यांना आणखी जोरजोरात आवाज आवाज देण्यास सुरूवात केली . शेवटी काकांनी ती ऐकू गेली व त्यांनी मोठ्याने ओरडून प्रतिसाद दिला. टिम त्यांच्या पर्यंत पोचली ते खुप घाबरलेल्या स्थितीमध्ये होते. पाणी व थोडे  खायला देऊन हाताला धरून धरुन त्यांना परत सुरक्षित कैवल्यधाम येथे आणून सोडले.

यावेळी पोलिस निरीक्षक सिताराम डुबल साहेब व पोलिस उपनिरीक्षक संदेश बावकार साहेब तो पर्यंत घटनास्थळी पोहोचले होते.

हे रेस्क्यूचे काम  शिवदुर्गचे राजेंद्र कडू , महेश मसने, योगेश उंबरे, योगेश दळवी,अमर ठाकर , राजेश ठाकर, अमित बलकवडे, राहुल दुर्गे , अमोल सुतार, सुनील गायकवाड (Lonavla News) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.