Pune News : लॉयला, विद्या व्हॅली, विद्याभवन उपांत्य फेरीत दाखल

एमपीसी न्यूज – यजमान लॉयला प्रशाला संघासह (Pune News) विद्या व्हॅली आणि विद्याभवन प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

लॉयला प्रशालेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात 12 वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने कल्याणी प्रशालेचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. आदिराज सिंग आणि तनुष खुने यांनी गोल केले. याच वयोगटात विद्याभवन प्रशाला संघाने विद्या व्हॅलीचा प्रतिकार 4-2 असा मोडून काढला.सामन्याच्या पहिल्या सात मिनिटात तीन गोल करून विद्याभवनने झकास सुरुवात केली होती. त्यानंतर विद्याव्हॅली संघाकडून रिआन खोगेकर आणि प्रत्युश वशिष्ठ यांनी गोल करून सामन्यात रंगत आणली. पण, विद्याभवनच्या जे. आदित्यने गोल करून संघाची आघाडी आधीत वाढवली होती.

Smart City :  गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट – अजित गव्हाणे

विद्या व्हॅली संघाने या पुराभवाची परतफेड 16 वर्षांखालील गटात केली. सिद्धांत जाधव आणि आरुष कविश्वर यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी गोलच्या जोरावर विद्या व्हॅलीने विद्या भवनचा 5-3 असा पराभव केला. विद्या व्हॅलीसाठी अन्य एक गोल सिद्धार्थ संखोळकरने केला. विद्याभवनचे तीन गोल आदित्य धुमल, अंकित गवारे आणि अॅरन मेंडेस यांनी केली.

निकाल –

16 वर्षांखालील – विद्या व्हओॅली 5 (सिद्धांत जाधव 13, 25 वे मिनिट, सिद्धार्थ सांखोळकर 38 वे, आरुष काशिवार 40, 57 वे मिनिट) वि.वि. विद्याभवन 3 (आदित्य धुमल 30 वे, अंकित गवारे 36 वे, अॅरन मेंडेस 43 वे मिनिट)

12 वर्षांखालील – विद्याभवन 4 (अर्णव भोसले, 2 रे. 7वे मिनिट, जोनाथन साळवे 4थे, आदित्य 18 वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली 2 (रिआन खोगेकर 9 वे, प्रत्युष वशिष्ठ 22 वे मिनिट)

लॉयला प्रशाला 2 (आदिराज सिंग 20+3 वे मिनिट, तनुष खुने 35वे मिनिट) वि.वि. कल्याणी प्रशाला 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.