Mahalunge : तळवडे येथे घराचे कुलुप तोडून दागिने व रोकड लंपास

एमपीसी न्यूज – तळवडे येथील गणेश खिंड परिसरातून घराचे (Mahalunge) कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे सागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. हि चोरी शुक्रवार (दि.5) ते रविवार (दि.7) या कालावधीत घडला.

याप्रकऱणी आदिल अकबर जमादार (वय 21 रा.तळवडे, गणेश खिंड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलुप लावून बंद असताना आरोपींनी घराचे कुलुप तोडले व घरात प्ररवेश करुन घरातील 4 तोळे वजनाच्या 80 हजार रुपयांच्या बांगड्या व 10 हजार रुपये रोख असा एकूण 90 हजार रुपये चोरून नेले आहेत. यावरून महाळुंगे एमआय़डीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Khed : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.