PCMC : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी आणि नुकसान भरपाई देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावे, असे आदेश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहेत.

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवर सुनावणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात  आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पालिकेचे आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त विनोद जळक आदी उपस्थित होते.

Mahalunge : तळवडे येथे घराचे कुलुप तोडून दागिने व रोकड लंपास

मृत्यू झालेले कर्मचारी कंत्राटी तत्वावर कामावर होते. त्याच्या वारसांना कामावर नोकरी देण्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले. (PCMC) त्याला राज्य शासनाने होकार दिल्याने एक कर्मचाऱ्यांच्या वारसाला पालिकेने नोकरी देण्याची कार्यवाही सुरू आहे. इतरांबाबतही योग्य तो निर्णय घेण्यात येत आहे.

एका कर्मचाऱ्यांने आरोग्य निरीक्षकाला मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात कारवाई मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, नियमानुसार पदोन्नती दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले. तसेच, इतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत माहिती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश डॉ. वावा यांनी आयुक्तांना दिले. .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.