Wakad : उसने पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून तरुणाचे अपहरण करत मारहाण

एमपीसी न्यूज : उसने पैसे वेळेवर दिले नाहित म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Wakad) हा प्रकार शुक्रवारी (दि.6) वाकड येथे मुंबई- बँगलोर महामार्गावर घडला.

याप्रकरणी जावेद आरिफ खान (वय 26 रा. भोसरी) यांनी वाकड पोलिसांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी रफिक मेहबुब शेख (वय 28 रा.देहुरोड) व आमान आमिन शेख (वय 21 रा.देहुरोड) यांना अटक केली आहे तर दोन अनोळखी इसावर गुन्हा दाखल केला आहे.

PCMC : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आमान याच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतले. ते वेळेवर परत केले नाहीत म्हणून आरोपीने फिर्यादीचे जबरदस्तीने अपहरण केले व मारहाण केली.(Wakad) तसेच फिर्यादीच्या भावाला व वडिलांना फोन करून जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत फिर्यादीला सोडणार नाही म्हणून धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.