Maharashtra : शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

एमपीसी न्यूज – हिंगोली जिल्ह्याचे शिंदे गटाचे (Maharashtara)खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजनामा दिला असून. मराठा आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी राजनामा देत असल्याचे सांगितले आहे.

पत्रात काय म्हणाले हेमंत पाटील?

Pimpri : केवायसी व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने तरुणाला घातला साडेसात लाखांचा गंडा

महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय(Maharashtara )अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना तीव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतक-यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

हेमंत पाटील यांच्या राजनाम्यामुळे सरकारवर अधिक दडपण वाढले असून याबाबत राज्यातील सरकार काय पाऊले उचलते हे पाहणे महत्वाचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.