Maharashtra : गृहकर्जाच्या दरात वाढ होऊनही गृह विक्री कायम; मुंबईतील घरांच्या विक्रीत 39 टक्क्यांची वाढ

एमपीसी न्यूज : ‘स्वत:चे घर असावे’ हे प्रत्येकाचे स्वप्न (Maharashtra) असते. मग ते घर छोटे असो वा मोठे. घर पहावे बांधून असे म्हणत म्हणत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हर एक व्यक्ती झटत असतो. आणि त्यामुळेच गृहकर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ होऊन देखील यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या कालावधीत मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल 38 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले. प्रॉपटायगरडॉटकॉमच्या (proptiger.com) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

 

या अहवालातून समजते, की दरात वाढ होऊन ही अन्न वस्त्र यांच्या किंमतीसोबतच निवाऱ्याच्या किंमती वाढल्या तरी लोकांनी ही मूलभूत गरज अति महत्त्वाची वाटते. आणि म्हणूनच भारतातील अव्वल आठ प्राथमिक निवासी बाजारपेठांनी या कालावधीदरम्यान चांगली कामगिरी केली. यामुळे विक्री व नवीन पुरवठ्यामध्ये अनुक्रमे 22 टक्के आणि 86 टक्क्यांची वाढ झाली.

प्रॉपटायगरडॉटकॉमच्या ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियलने जानेवारी-मार्च 2023 दरम्यान केलेल्या अहवालानुसार रिअल इस्टेट विकासकांनी लोकांच्या घर खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता बाजारपेठेत नवीन उत्पादने आणली. आठ शहरांमधील विक्रीत गेल्या वर्षीच्या जानेवारी-मार्च कालावधीदरम्यानच्या 70, 630 युनिट्सवरून जानेवारी-मार्च 2023 मध्ये 85,850 युनिट्सपर्यंत वाढ झाली.

या आठ प्रमुख शहरांमधील नवीन सादरीकरणांमध्ये 79,530 युनिट्सवरून 86 टक्क्यांच्या वाढीसह 147,780 युनिट्सपर्यंत वाढ झाली, जी गेल्या तिमाहीत सर्वाधिक आहे.

प्रॉपटायगरडॉटकॉम, हाऊसिंगडॉटकॉम आणि मकानडॉटकॉमचे समूह मुख्य (Maharashtra) वित्तीय अधिकारी विकास वाधवान म्हणाले, ‘‘भारतीय गृहनिर्माण बाजारपेठेत लक्षणीय वाढ होण्यासोबत विक्री आणि नवीन सादरीकरणे या दोन्हीमध्ये वाढ होत आहे. ही बाब विशेषतः आव्हानात्मक जागतिक वातावरण आणि देशांतर्गत बाजारपेठेत गृहकर्जावरील व्याजदरातील वाढ पाहता लक्षणीय आहे. या अडथळ्यांना न जुमानता अहवालात 2023 च्या पहिल्या तिमाहीमधील घरांच्या विक्रीत २२ टक्क्यांची उच्च दुहेरी-अंकी वाढ दिसण्यात आली आहे, ज्यामधून विक्रीला सतत गती मिळत असल्याचे दिसून येत आहे.’’

घरांच्या विक्रीत हैदराबाद शीर्षस्थानी असून येथे घरांच्या विक्रीत 55 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या पाठोपाठ मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि चेन्नईचा क्रमांक लागतो जेथे अनुक्रमे 39 टक्के, 31 टक्के, 16 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, बेंगळुरू, कोलकाता, दिल्ली येथील घरांच्या विक्रीत अनुक्रमे 3 टक्के, 22 टक्के आणि 24 टक्क्यांची घट झाली आहे.

महाराष्ट्रातील दोन प्रमुख बाजारपेठा मुंबई व पुणे येथे विक्रीत अनुक्रमे 39 टक्के आणि 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये निवासी मालमत्तांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमधील 23, 370 युनिट्सच्या तुलनेत 2023 च्या पहिल्या तिमाहीत 32,380 युनिट्सपर्यंत वाढ झाली.

पुण्यामध्ये घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमधील 16,320 युनिट्सवरून कॅलेंडर वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत 18.920 युनिट्सपर्यंत वाढ झाली.

Pune : पुण्यातील 33 लाख नागरिकांनी आधार कार्ड अपडेट केलेले नाही; पालिकेतर्फे विशेष मोहीम जारी

नवीन पुरवठ्यामध्ये मुंबई अग्रस्थानी –

विक्रीच्या तुलनेत आठही शहरांमधील नवीन सादरीकरणांमध्ये वाढ झाली, जेथे 2023 च्या पहिल्या तिमाहीत एकूण 1,47,794 युनिट्स सादर करण्यात आले, जे तिमाहीमधील आतापर्यंतचे सर्वाधिक नवीन सादरीकरणे आहेत. यामुळे वार्षिक जवळपास 86 टक्क्यांची वाढ झाली. नवीन पुरवठ्यासंदर्भात मुंबई शहर अग्रस्थानी म्हणून कायम राहिले, जेथे 2023 च्या पहिल्या तिमाहीमधील एकूण नवीन सादरीरकणांमध्ये मुंबईचा 41 टक्क्यांचा मोठा वाटा होता.

2023 च्या पहिल्या तिमाहीत अधिकतम नवीन पुरवठा 45 लाख ते 75 लाख रूपयांच्या श्रेणीमधील होते, जेथे एकूण सादरीकरणांमध्ये सर्वोच्च (32 टक्के) वाटा होता. 1 कोटी रूपयांहून अधिक किमतीच्या श्रेणीमधील युनिट्सचा देखील 29  टक्क्यांचा लक्षणीय वाटा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.