Pune darshan : पीएमपीएमएल कडून वातानुकूलित “पुणे दर्शन ” बससेवा

ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर करता येणार

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर पर्यटकांना घडविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे दर्शन बससेवा पुरवण्यात येते. (Pune darshan) मुलांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्या आणि या काळात पर्यकांची वाढती संख्या लक्षात घेत पीएमपीएमएल कडून वातानुकूलित “पुणे दर्शन” बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे दर्शनाचा हा प्रवास आता गारेगार होणार आहे.

Pune : पुण्यातील 33 लाख नागरिकांनी आधार कार्ड अपडेट केलेले नाही; पालिकेतर्फे विशेष मोहीम जारी

पुणे दर्शन बससेवेसाठी फक्त 500 रूपये तिकीट आहे. पीएमपीएमएलच्या डेक्कन जिमखाना बसस्थानक व मोलेदिना बसस्थानक पुणे स्टेशन या दोन ठिकाणांवरून पुणे दर्शन बससेवा देण्यात येते. या दोन्ही ठिकाणी पुणे दर्शन बसचे तिकीट बुक करता येईल. पुणे दर्शन बस पुणे स्टेशन बसस्थानकावरून सकाळी 8.45 वा. सुटते व डेक्कन जिमखाना बस स्थानकावरून सकाळी 9.00 वा. सुटते. (Pune darshan) तसेच पुणे दर्शन बससेवेमध्ये पीएमपीएमएल कडून नेमण्यात आलेल्या गाईड कडून स्थळांची माहिती दिली जाते. तरी सदरच्या पुणे दर्शन बससेवेचा लाभ नागरीक, पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

पुणे दर्शन बससेवा खालील ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवते
1.  केसरीवाडा
2. शनिवारवाडा
3.  लालमहाल
4.  श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिर (बाह्य दर्शन)
5.  महात्मा फुले वाडा
6. आगाखान पॅलेस
7. आदिवासी वस्तू संग्रहालय
8.  युद्ध भूमी/नॅशनल वॉर मेमोरियल सदन कमांड एरिया
9.  शिंदे छत्री
10. राजीव गांधी प्राणी संग्रहालय
11. सारसबाग गणपती मंदिर
12. महालक्ष्मी मंदिर (बाह्य दर्शन)
13. पु. ल. देशपांडे उद्यान
14. केळकर संग्रहालय
15. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय
16. चतु:श्रुंगी माता मंदिर
17. इस्कॉन मंदिर, कोंढवा रोड

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.