Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढणार?

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 15 दिवस राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सर्वांचं सरसकट मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये राज्यातील 18 ते 44 वयोगटात 5 कोटी 71 लाख नागरिक आहेत त्यांना मोफत लस मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.