Gudhi Padva : नेदरलँडमध्ये मराठी बांधवांनी साजरा केला गुढी पाडवा

एमपीसी न्यूज : गुढी पाडवा (Gudhi Padva) या सणांनी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. अशाच अल्मेरे महाराष्ट्र मंडळांनी इंग्लंड अमेरिकेत राहून देखील मराठी संस्कृती जपलेली दिसून आले आहे.

इंग्लंड आणि अमेरिकेत मराठी कुटुंब दिसणे नाविन्य नाही. मात्र, अलीकडच्या काळात अनेक छोट्या छोट्या युरोपियन देशांत देखील मराठी कुटुंब मोठ्या संख्येने येत आहेत.

नेदरलँड या देशातील अल्मेरे या शहरात मोठ्या संख्येने मराठी कुटुंब वास्तव्यास आहे. दिवाळीत सर्वांनी एकत्र येऊन अल्मेरे मराठी मंडळाची स्थापना केली. या मंडळाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Lonavala : आडोशी बोगद्याजवळ ट्रक उलटल्याने एक्सप्रेस वेवर वाहतूककोंडी

मराठी संस्कृतीमध्ये नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने (Gudhi Padva) होते. गुढीपाडव्याच्या दिवशी मंडळाने विविध कार्यक्रम घेतले. त्यामध्ये त्यांनी (Pune) लहानांचे श्लोक, पठण, मराठी पारंपारिक वेशभूषा, महाराष्ट्रातील लोकधारा, तबलावादन, शिवकाव्य, गणेश वंदना, जोगवा, वाडा गाण्याच्या सादरीकरणातून मराठी संस्कृती फक्त टिकवली नाही तर वृद्धिंगत केली.

कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताच्या समूह गीताने झाली. सर्व स्त्रियांनी पैठणी साड्या परिधान केल्या होत्या.  अस्सल मराठमोळ्या श्रीखंड पुरीच्या बेताने कार्यक्रमात रंगत‌ आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.