Maharashtra : ‘बर्ड ऑफ ओल्ड मॅगझीन हाऊस’ या पुस्तकाचे कर्नाटकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – दांडेली ओल्ड मॅगेझीन हाऊस जंगलातील (Maharashtra) आढळणाऱ्या पक्ष्यांवरआधारीत ‘बर्ड ऑफ ओल्ड मॅगझीन हाऊस’ या पुस्तकाचे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते गुरुवारी (दि.23) प्रकाशन झाले. या पुस्तकाचे लेखन सुधीर हसमनीस असून त्यांना सहलेखक म्हणून आनंद विकाम्शी आणि शाम शंकर भट यांनी सहकार्य केले आहे.

ओल्ड मॅगझीन हाऊस हे जंगल लॉजेस रिसॉर्ट्सचे गणेशगुडी, दांडेली येथील रिसॉर्ट आहे. तेथील जंगलात दिसणाऱ्या पक्ष्यांवर आधारित हे पुस्तक आहे आणि त्यात 100 पेक्षा जास्त पक्षी सादर केले आहेत. 120 पानाचे हे पुस्तक संपूर्ण रंगीत आर्ट प्लेट्सचे आहे.

PCMC: महापालिका कंत्राटदारांना ‘रेट दे कॉन्ट्रॅक्टर’ पद्धत अवलंबविण्याचा विचार; आयुक्त सिंह

गेल्या 7 वर्षांचे हे प्रयत्न आहेत. त्यात निसर्ग संवर्धन, छायाचित्रण आणि पक्षी निरीक्षण यांचा समावेश आहे. या प्रकाराचे हे पहिलेच असे पुस्तक आहे. वाचकांच्या आवडीनुसार अल्फाबेटिकली त्याची रचना आहे.

थावरचंद गेहलोत, राज्यपाल, कर्नाटक राज्य यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि अशी अजून काही पुस्तके या विषयावर यायला हवीत असे मत व्यक्त केले. त्यांना या पुस्तकाचे आरेखन आणि (Maharashtra) मांडणी खूप आवडली. या पुस्तकांचे नाविन्यपूर्ण आरेखन आणि मांडणी चंद्रमोहन कुलकर्णी आणि राजेश भावसार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.