Chinchwad : स्वामी समर्थ हे आनंदस्वरूप आहेत – स्वामी स्वरूपानंद

एमपीसी न्यूज – “स्वामी समर्थ हे आनंदस्वरूप आहेत, दृढ श्रद्धा ठेवून स्वतःला (Chinchwad) त्यांच्या ठायी समर्पित करा म्हणजे स्वामी तुम्हाला निर्भय अन् निर्मळ करतील!” असे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड येथे शुक्रवार (दि.24) केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय प्रकटदिन उत्सवात ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या विषयावरील निरूपण करताना स्वरूपानंद बोलत होते.

 

मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, कोषाध्यक्ष गणपती फुलारी, सचिव संजय आधवडे, नितीन चिंचवडे, हेमा दिवाकर आदी यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रवचनापूर्वी, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त जगन्नाथ चव्हाण, धरमदास कुंभार आणि मधू जोशी या संस्थापक सदस्यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान करण्यात आला. मधू जोशी यांनी सन्मानार्थींच्या वतीने कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. प्रकट दिन उत्सवात (Chinchwad) पहाटे साडेचार वाजता श्रींचा फळांच्या रसाने अभिषेक आणि पूजा करण्यात आली.

 

स्वामींच्या मूर्तीला आदिशक्ती वस्त्र आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. सकाळी सात वाजता श्रीधरनगर येथील दत्तमंदिरापासून मठापर्यंत गुरूलीलामृत ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. आळंदी येथील वारकरी भागवत कीर्तन भजन गायन गुरुकुलातील सुमारे चाळीस विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगासह आणि परिसरातील कलशधारी महिला तसेच पुरुष भाविकांनी फुगड्या, जयघोष करीत दिंडीमध्ये भक्तिरसाचा परिपोष केला.

सकाळी साडे सात वाजता श्रींच्या आरतीनंतर स्वामी स्वाहाकार यज्ञास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता गुरुलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्यात सुमारे दीडशे स्त्री-पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. दुपारी बारा वाजता आरती आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला; तर सायंकाळी साडे पाच वाजता श्रींची सामुदायिक आरती करण्यात आली.

Maharashtra : ‘बर्ड ऑफ ओल्ड मॅगझीन हाऊस’ या पुस्तकाचे कर्नाटकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे सदस्य शंकर बुचडे, विजय कुलकर्णी, मीनल देशपांडे यांनी संयोजनात सहकार्य केले. महेश राजोपाध्ये यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले; तर कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.