Mahrashtra : यंदाचा पुरुषोत्तम करंडक टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘पिक्सल्स्‌‍’ एकांकिकेने पटकावला

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रीय कलोपासक (Mahrashtra ) आयोजित 58 व्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘पिक्सल्स्‌‍’ एकांकिकेने बाजी मारत प्रतिष्ठेचा ‘पुरुषोत्तम करंडक’ पटकावला. मात्र स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनय, वाचिक अभिनयासाठीची पारितोषिके कोणालाही देण्यात आली नाहीत.

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात झाली. यावेळी सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी जयराम हर्डीकर करंडक गणेशखिंड च्या मॉडर्न महाविद्यालयाने ‘फेलसेफ’ एकांकिकेसाठी मिळवले.

Hadapsar : लोहिया उद्यानात हिंदू धर्मांतराविरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य जनजागृती मोर्चा

प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या नऊ संघाचे अंतिम फेरीच्या तीन सत्रात सादरीकरण झाले. त्यानंतर स्पर्धेचा निकाल निकाल जाहीर करण्यात आला. रंगकर्मी दीपक रेगे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर-जोग यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेतील सांघिक द्वितीय (Mahrashtra) क्रमांकाचा हरी विनायक करंडक स. प. महाविद्यालयाच्या कृष्णपक्ष एकांकिकेला, तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाला रवायत-ए-विरासत या एकांकिकेसाठी मिळवला. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीला (व्हीआयआयटी) सर्वोत्कृष्ट आयोजित संघाचा भगीरथ करंडक जाहीर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.