Hadapsar : लोहिया उद्यानात हिंदू धर्मांतराविरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य जनजागृती मोर्चा

एमपीसी न्यूज : रविवारी 10 सप्टेंबर रोजी (Hadapsar) पुण्यातील हडपसरमधील लोहिया उद्यानात हिंदू धर्मांतराविरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य जनजागृती मोर्चा पार पडला. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी या मोर्च्याचे नेतृत्व केले. ख्रिश्चन मिशनरींकडून सुरू असलेल्या हिंदू धर्मांतराबद्दल या मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदू बंधू-भगिनींना याविरोधात एकत्रित होऊन लढण्याचं आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार राम सातपुते, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, माजी नगरसेवक मारुतीबा तुपे, उज्वला जंगले यांच्यासह अनेक मान्यवरांसह स्थानिक नेते व समाज बांधव उपस्थित होते.

आपल्या भाषणादरम्यान आमदार राम सातपुते यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करताना सांगितले की, “वर्षानुवर्षे महिलांवर जघन्य गुन्हे होत असल्याच्या बातम्या येत आहेत आणि जेव्हा त्या न्याय मागतात तेव्हा त्यांच्यावरच आरोप केले जातात. अशा खोट्या आरोपांना हिंदू उभे राहणार नाहीत.

Pimpri : मराठा-ओबीसी संघर्षाचा डाव हाणून पाडा – काशिनाथ नखाते

पोलिसांनी या परिस्थितीची दखल घेणे अत्यावश्यक (Hadapsar) आहे. हिंदू समाज जागृत झाला आहे आणि महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा लागू होण्याची गरज आहे.

माजी आमदार योगेश टिळेकर यांनी गेल्या दशकभरात हडपसरमधील धर्मांतराच्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करून, या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हिंदू नागरिकांनी सामूहिक कृती करण्याची गरज आहे असे वक्तव्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.