Morwadi : आरोग्य शिबिर, बचत गट प्रशिक्षणाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – माजी नगरसेविका (Morwadi) अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरवाडी, दत्तनगर ,विद्यानगर परिसरामध्ये आयोजित आरोग्य शिबिर,बचत गट प्रशिक्षणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 480 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

या आरोग्य शिबिरामध्ये स्तनरोग चाचणी ,कर्करोग चाचणी सोनोग्राफी, एक्स-रे, मधुमेह रक्त तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करून जागेवर रिपोर्ट देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, राजू दुर्गे, तुषार हिंगे, विशाल काळभोर, गजानन लोकसेवा बँकेचे अध्यक्ष योगेश बाबर, दिलीप दातीर पाटील ,गणेश लंगोटे, अण्णा लुकर उपस्थित होते.

त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी उद्योजकता शिबिराचे आयोजन शाहूनगर येथे करण्यात आले होते. याला 30 महिला बचत गटांनी प्रतिसाद नोंदवला. तसेच सायंकाळी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह पार पडला त्यामध्ये प्रभागातील 350 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Pimpri : मराठा-ओबीसी संघर्षाचा डाव हाणून पाडा – काशिनाथ नखाते

याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा (Morwadi) पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे, पुणे विद्यापीठाचे सदस्य राहुल पाखरे, तुषार हिंगे, विजय वरुडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पिंपरी विधानसभा भाजपा प्रमुख अमित गोरखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.