Talegaon Dabhade : मोफत आरोग्य शिबिरात 200 जणांची आरोग्य तपासणी   

एमपीसी न्यूज – घोरावडेश्वर महाशिवरात्री यात्रा सोहळ्यानिमित्त स्व राजाराम राक्षे यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब तळेगाव दाभाडे आणि निलेश राक्षे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ( Talegaon Dabhade ) महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात 200 लोकांची आरोग्य तपासणी तर 250 लोकांना औषधांचे वाटप करण्यात आले.
जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीची यात्रा याचा विचार करून आरोग्य शिबिरामध्ये रक्त,शुगर, डोळे तपासणी,तोंडाचा व घश्याचा कॅन्सर तपासणी यांचे आयोजन करण्यात आले, तसेच लोकांना व्हिटॅमिन डी3 आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
Medicover Hospital भोसरी तसेच TCH ecology Centre Talegaon यांच्या प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या मेहनतीने कार्यक्रमात अंदाजे दोनशे (200) लोकांनी health checkup केले आहे, आणि अडीचशे (250) लोकांना औषधांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन घोरावडेश्वर उत्सव समिती अध्यक्ष निलेश राक्षे आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष उद्धव चितळे यांनी केले, कार्यक्रमात रोटरी सेक्रेटरी श्रीशैल मेंथे,डॉ मुंडार्गी,डॉ नेहा कुलकर्णी, प्रमोद दाभाडे,अमित,रो मथुरे,निलेश भोसले,रामनाथ गराडे यांचे मोलाचे सहकार्य ( Talegaon Dabhade ) लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.