Talegaon Dabhade : होमिओपॅथी दिनानिमित्त तळेगावमध्ये आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज – होमिओपॅथी दिनानिमित्त सुखद होमिओपॅथी व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या संयुक्त (Talegaon Dabhade) विद्यमाने यशवंत नगर बायोडायव्हर्सिटी पार्क येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 100 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. होमिओपॅथी ही उपचार पद्धती अनेकजण स्वीकारत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांचा 10 एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्ताने दरवर्षी 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. होमिओपॅथी उपचार पद्धती जगभरात प्रसिद्ध आहे. कारण होमिओपॅथीच्या उपचारावरचा लोकांचा विश्वास वाढला आहे. होमिओपॅथीच्या गोळ्यांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते.
या शिबिरामध्ये सुखद होमिओपॅथीच्या डॉ सायली देबडवार-फुटाणे यांनी मधुमेह तपासणी (Talegaon Dabhade) रक्तदाब तपासणी व इतर सामान्य आरोग्य तपासण्या केल्या व उंची, वजन, शरीरातील चरबी, पाण्याचे प्रमाण, शारीरिक क्षमता याची योग्य माहीती देऊन शरीर निरोगी राहण्याकरता आहाराबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. जवळपास 100 जणांनी या शिबिरचा लाभ घेतला. होमिओपॅथीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सुखद होमिओपॅथी तर्फे असे उपक्रम राबवण्यात येतात.
जागतिक होमिओपॅथी दिन 2024 ची थीम
जागतिक होमिओपॅथी दिन 2024 साठी खास थीम निवडण्यात आली आहे. होमिओपॅथीच्या क्षेत्रात संशोधनावर भर देणे आणि कुशलता वाढवणे ही यावर्षीची थीम आहे. होमिओपॅथीचे सध्याचे संशोधन आणि ही उपचार पद्धती अधिक चांगली होण्यासाठीचा प्रयत्न यावर भर देणारी ही थीम आहे. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी होमिओपॅथीचा वापर करण्यासाठी हे प्रयत्न केले जाणार (Talegaon Dabhade) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.