Talegaon Dabhade : मुस्लीम समाजातील गरजूंना मदत करण्याची रमजान ईद निमित्त घोषणा

तळेगावात रमजान ईद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – सर्व मानव जातीला बंधुभाव आणि सामाजिक एकोप्यासाठी ( Talegaon Dabhade) अल्लाहने आशीर्वाद द्यावेत, अशी सामुदायिक प्रार्थना करीत तळेगाव परिसरातील मुस्लीम बांधवांनी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद गुरूवारी (दि. 11) उत्साहात साजरी केली. रमजान ईदच्या दिवशी तळेगाव येथील जामा मस्जिद ट्रस्टने मुस्लीम समाजातील गरजूंना मदत करण्याचा उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा केली. याचा समाजातील अनेकांना फायदा होणार आहे.

गाव भागातील ईदगाहवर सकाळी मौलाना सिंकदर ए आजम यांनी ईद नमाज पठणाचे नेतृत्व केले. मुस्लीम बांधवांनी भक्तीभावाने नमाज अदा केली. यावर्षी गावभागातील जामा मस्जिद ट्रस्टने घेतलेल्या निर्णयानुसार रमजान ईद पासून मुस्लिम समाजातील गोरगरीब, गरजु कुटुंबांसाठी कायमस्वरूपी मदतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ट्रस्टी रशिदभाई सिकिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो राबविण्यात येणार असून मुलामुलींचे लांबलेले विवाह, विधवा परितक्ता महिलांच्या समस्या, कौटुंबिक आर्थिक रोजगार किंवा कायदेशीर बाबींबाबत सेवाभावी मोफत सेवा देण्याची घोषणा मौलाना सिकंदर ए आजम यांनी नमाज पठणानंतर केली.

Maval : कामशेत येथे भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा

यावेळी माजी उपनगराध्यक्ष व समाजाचे ज्येष्ठ नेते गनिमियॉं सिकिलकर, गफूरभाई मुलाणी, बाबुलाल नालबंद, अमीन खान,  इर्शाद अन्सारी, समीर नालबंद, रफिक सिकिलकर, राजू आत्तार आदी उपस्थित होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी गुलाबपुष्प देवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस उप निरीक्षक भारत वारे यांच्यासह प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंडे, अमोल गोरे, विकास तारू, आकाश भालेराव, अर्चना पानसरे,वैशाली बोरकर आदी यावेळी उपस्थित ( Talegaon Dabhade) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.