Maval : कामशेत येथे भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा

एमपीसी न्यूज – भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा कामशेतमधील ( Maval ) गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव येथे शुक्रवारी (दि. 12) सकाळी दहा वाजता होणार आहे.महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे आणि तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी दिली.

पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे (दि10) भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .

LokSabha Elections 2024 : मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मावळ भाजपच्या वतीने शुक्रवार दि 12 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वा.गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव ( कामशेत ) येथे सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती यावेळी बोलताना निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे व तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी दिली.

तसेच या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, मा.राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे व पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार असून मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व सुपर वॉरियर्स,बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या ( Maval ) संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मावळ भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते निवृत्ती शेटे, प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर,जेष्ठ नेते राजाराम शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड, जेष्ठ नेते शिवाजी टाकवे, मा.सभापती गुलाब  म्हाळसकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव रघुवीर शेलार,भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य जितेंद्र  बोत्रे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकूले, भाजपा पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण राक्षे, भाजपा पुणे जिल्हा ओबीसी आघाडी अध्यक्ष दत्तात्रय माळी, ता.सरचिटणीस अभिमन्यू शिंदे,सचिन येवले,महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, वडगाव शहर भाजपा नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक, लोकसभा विस्तारक भूषण जोशी , मावळ विधानसभा विस्तारक रविंद्र देशपांडे,यांच्यासह मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित ( Maval ) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.