Madha : धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

एमपीसी न्यूजमाढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना ( Madha ) उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा दिला राजीनामा दिला आहे.  लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, असल्याची माहिती समोर आली आहे. 

धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले होते. तसा त्यांनी प्रसार माध्यमातून प्रचार आणि प्रसारही केला होता. भाजपकडे अतिशय ताकदीने आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. परंतु भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक-निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील  यांना नाराज केले.

Talegaon Dabhade : होमिओपॅथी दिनानिमित्त तळेगावमध्ये आरोग्य शिबीर

काल (गुरुवारी दि. 11 )  धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्रीच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही केवळ माढा वगळता इतर सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा केली.

येत्या 13 एप्रिलला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली ( Madha ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.