Mahashivratri News : ‘घोरावडेश्वरा’ला यंदा मोजक्या भाविकांकडून अभिषेक

एमपीसीन्यूज : शेलारवाडी येथील श्री क्षेत्र घोरावडेश्वर येथील महाशिवरात्री उत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. यानिमित्त निमित्त घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी रात्री बारा वाजता मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक रघुवीर शेलार, सचिव योगेश शेलार, विश्वस्त मधुकर बोडके, विजय भोंडवे, शैलेश मुऱ्हे, अमित भेगडे, तुषार तरस, संतोष शेलार तसेच पुरात्तव विभागाचे संदीप पडवळ, वनविभागाच्या श्रीमती वाघमारे, पुजारी बोडकेमहाराज आदी मोजकी मंडळी उपस्थित होती.

कोरोनाच्या संक्रमणामुळे महाशिवरात्री निमित्त घोरावडेश्वर मंदिरासह सर्व शिव मंदिरांच्या यात्रा (उत्सव) रद्द करून साध्या पध्द्तीने पुजारी व विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी रात्री बारा वाजता मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

आज गुरुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी फक्त मंदिरातील पुजारी व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक पूजा करण्यात आली. तर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.