Pimpri : पिंपरी कॅम्पात किराणा दुकानाला आग; जीवनावश्यक वस्तूंसह दुकानाचे नुकसान

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प मधील रिव्हर रोड येथे लागलेल्या आगीत एक किराणा दुकान जळून खाक झाले. यामध्ये दुकानातील जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य जळाले आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्प मधील रिव्हर रोड येथे न्यु सुमित प्रॉव्हिजन अँड जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने दुकानात आग लागली. दुकानातील किराणा समान आणि फ्रीज, जिना, दरवाजा असे साहित्य जळाले आहे.

सुमित शामलाल जेगरणी यांनी आगीची वर्दी अग्निशमन विभागाला दिली. संत तुकाराम नगर येथील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत आग पसरली होती. दुकानातील वस्तू आणि साहित्य आगीत सापडले होते. दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.