Major Fire: सणसवाडी एमआयडीसी मधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज: सणसवाडी एमआयडीसी मधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
श्रीनाथ प्लास्टिक इंडस्ट्रिज या कंपनीला 11 जुलैला दुपारी 2 च्या सुमारास आग लागली होती. ह्या कंपनीमध्ये प्लास्टिकच्या कुंड्या बनवल्या जातात.(Major Fire) दुपारी कंपनीमध्ये वेल्डिंग चे काम चालू असताना अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

सणसवाडी एमआयडीसी मधील श्रीनाथ प्लास्टिक इंडस्ट्रिजला रविवारी दुपारी भिषण आग लागली. सणसवाडी गावचे उपसरपंच सागर दरेकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की दुपारी कंपनीमध्ये अचानक आग लागली व धुराचे लोट लांब पर्यंत दिसू लागले.(Major Fire) 10 ते 25 स्थानिक ग्रामस्थ तेथे आले व त्यांनी कंपनीमधील जमेल तेवढे  प्लास्टिकचे सामान बाहेर काढले जेणेकरून आग जास्त भडकू नये. आग लागताच सर्व कामगार बाहेर पळाले त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.

 

पिएमआरडीए अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांना अडीच ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.