Maval : एकविरा गडावर सौरदिवे, सीसीटीव्ही आणि बाकड्यांची व्यवस्था

एमपीसी न्यूज – एकविरा गडावर भाविकांच्या सुरक्षेसाठी (Maval) वन विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे, सौरदिवे लावण्यात आले आहेत. तसेच भाविकांना, पर्यटकांना बसण्यासाठी बाकड्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

वेहेरगाव (कार्ला) येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी तसेच कार्ला लेण्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आणि पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकविरा गडावर तसेच लेणी परिसरात सौरदिवे, सीसीटीव्ही आणि बाकडे बसविण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे.

हे काम मुख्य वनसंरक्षक एन आर‌ प्रविण, उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावार, वन परीमंडळ अधिकारी कार्ला प्रमोद रासकर, वनरक्षक गणेश धुळशेटे यांनी केले आहे.

YCMH : मृत्यूचा बनावट दाखला देणे भोवले, दोन वेतनवाढ रोखल्या

एकविरा गडावर येणारे भाविक पाण्याच्या बाटल्या गडावर व (Maval) इतरत्र टाकतात. यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडल्याचे पहायला मिळते. त्यामुळे या परिसरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वनविभागामार्फत बाॅटल क्रशर बसविण्यात येणार आहे. वनविभागाकडून होत असलेल्या कामाचे वन्यजीव रक्षक मावळ संस्था, गावकरी व भाविकांकडून स्वागत व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.