Pune : विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी कार्यशाळा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने ‘लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारनिर्मुलन आणि भारतीय संविधान’ या विषयावर विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

YCMH : मृत्यूचा बनावट दाखला देणे भोवले, दोन वेतनवाढ रोखल्या

गांधी भवन मिनीथिएटर ( एसी हॉल) कोथरूड, पुणे (Pune) येथे रविवार, 28 मे 2023 रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मिलींद गायकवाड (Pune) हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी देणगी प्रवेशमुल्य 100 रुपये असून नोंदणीसाठी संदीप बर्वे 9860387827, मनिष देशपांडे 9921945286, सुदर्शन चखाले 788 763 0615, नीलम पंडीत 9823948048 यांच्याकडे नोंदणी करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.