Maval Corona Update : तालुक्यात आज 65 नवे रुग्ण तर 50 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि. 27) 65 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 491 इतकी आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 795 आहे.

शहरी भागात 19 तर ग्रामीण भागात 46 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 17 रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,821 झाली आहे. तर दिवसभरात 50 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 16, कार्ला 7, वाकसई 3, साते, सोमाटणे, पिंपळोली, आंबी व वराळे प्रत्येकी 2, वरसोली, चांदखेड, मोहितेवाडी, धामणे, पाथरगाव, इंदोरी, कान्हे, माळवाडी, नवलाख उंब्रे व निगडे प्रत्येकी 1 असे एकूण 46 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 22533 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,611 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,998 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,208 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 12,817 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,004 रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.06 टक्के आहे तर मृत्यू दर 2.06 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 244, लोणावळा नगरपरिषदमध्ये 89, वडगाव नगरपंचायतमध्ये 24 व ग्रामीण भागात 440 असे एकूण 795 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.