Maval Corona Update : मावळात गुरुवारी 65 रुग्णांची नोंद; 67 जणांना डिस्चार्ज

कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 979 झाला आहे. : 65 patients registered in Maval on Thursday; Discharged 67 people

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 6) 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 979 झाला आहे. तर आज 67 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 45 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये टाकवे बु., वराळे येथील प्रत्येकी चार, कामशेत, इंदोरी, गहुंजे, जांभूळ येथील प्रत्येकी दोन आणि कान्हे, शिरगाव, साते, तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

शहरी भागात सापडलेल्या 45 रुग्णांपैकी 33 रुग्ण तळेगाव शहरातील आहेत. लोणावळा शहरातील 7 रुग्ण आहेत. तर वडगाव नगर पंचायत क्षेत्रात आज 5 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 979 रुग्णांमध्ये सध्या 331 रुग्ण सक्रीय आहेत. तर 618 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात 283 आणि होम आयसोलेशनमध्ये 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

331 सक्रीय रुग्णांपैकी 232 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. तर 99 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.