Maval Corona Update: नवीन आठ रुग्णांचे निदान, तालुक्यात 100 सक्रिय रुग्ण

Maval Corona Update: Diagnosis of eight new patients, 100 active patients in the taluka तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या 57 झाली आहे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज दिवसभरात तळेगाव दाभाडे येथे तीन, ब्राह्मणवाडी (साते) व इंदोरी येथे प्रत्येकी दोन, माळीनगर (वडगाव) येथे एक, अशा एकूण 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. तालुक्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 100 आहे. तर आज दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

तळेगाव स्टेशन येथील एमएसइबी रोड जवळील ओझोन निलय सोसायटीमधील 21 वर्षीय दोन मित्र पाॅझिटिव्ह मित्राच्या संपर्कात आल्याने लक्षणे जाणवली. आज शनिवारी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. जनरल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्या निकटच्या संपर्कातील दोन व्यक्ती आहेत.

तळेगावातील लोहगड सोसायटीतील 30 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या निकटच्या संपर्कात आल्याने सदर व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांच्या निकटच्या संपर्कातील दोन व्यक्ती आहेत.

ब्राह्मणवाडी (साते) येथील 35 वर्षीय व्यक्ती व 26 वर्षीय महिला या दोन्ही पती-पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. निकटच्या संपर्कातील 16 व्यक्ती आहेत.

इंदोरी येथील प्रगतीनगरमधील 48 वर्षीय व्यक्ती व कानिफनाथनगरमधील 30 वर्षीय युवक या दोघांना लक्षणे आढळल्याने स्वॅब घेण्यात आला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

त्याच बरोबर वडगाव मावळ येथील माळीनगरमधील 31वर्षीय व्यक्ती पिंपळे सौदागर येथील पाॅझिटिव्ह रूग्णाच्या निकटच्या संपर्कात आल्याने त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आजपर्यंत तालुक्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 192 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 83 जणांना घरी सोडण्यात आले आहे तर उर्वरित 100 रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या 57 झाली आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 33 रूग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.