Maval : इंद्रायणी नदीत बुडून तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इंदोरी येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणीचा मृत्यू (Maval )झाला. ही घटना सोमवारी (दि. 3) घडली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी तरुणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

प्रज्ञा कौशल भोसले (वय 23, रा. वराळे, तळेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने जागतिक डॉक्टर डे व सीए डे साजरा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा ही इंदोरी येथे इंद्रायणी नदीत सोमवारी बुडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, निनाद काकडे, सुरज शिंदे, भास्कर माळी, अवि कारले, रोहित दाभाडे, गणेश गायकवाड, सुरज गोबी, विनय सावंत, शुभम काकडे, राजू सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेऊन मृतदेह सोमवारी सायंकाळी बाहेर काढला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत (Maval ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.