Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने जागतिक डॉक्टर डे व सीए डे साजरा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Talegaon Dabhade)  एमआयडीसीच्या वतीने जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे शनिवारी (दि.1) साजरा करण्यात आला. समाजातील सर्व घटकातील नागरिकांना समान सेवा देत असल्याबद्दल रोटरीच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Talegaon Dabhade : पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष – अनिल खामकर

कार्यक्रमाला रोटरी जिल्हा 3131 चे उपप्रांतपाल रो शंकर गौडा हादीमनी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष रो राहुल खळदे यांनी मान्यवरांना संबोधित केले तसेच कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सुदाम दाभाडे, माजी अध्यक्ष अजय पाटील, माजी अध्यक्ष हिरामण बोत्रे व इतर सर्व रोटेरियन उपस्थित होते.

 

शनिवार (01) रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या (Talegaon Dabhade) वतीने जागतिक डॉक्टर डे व सीए डे हा साजरा करण्यात आला. समाजातील सर्व घटकातील सर्व धर्मीयांना समान न्याय देऊन आपली सेवा देत असतात याबद्दल कृतज्ञता म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

तसेच क्लबचे सेक्रेटरी रोटेरियन सुनील खोल्लम हे सीए असल्याने त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.. या ठिकाणी सर्व डॉक्टरांना एक ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले… तसेच जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक सर्व मान्यवरांना देण्यात आले

 

प्रकल्प प्रमुख डॉ युवराज बडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व तसेच रोटेरियन दशरथ जांभुळकर यांनी सूत्रसंचालन केले माजी अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे यांनी शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाला  इतर रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.