Talegaon Dabhade : पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष – अनिल खामकर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सुमारे 10 लाख शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Talegaon Dabhade) करतात. मात्र शासनाकडून पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल खामकर यांनी केले .
रविवारी (दि. 2) तळेगाव दाभाडे येथे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनच्या पदाधिका-यांची विशेष सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्ताना मार्गदर्शन करतांना खामकर बोलत होते.
यावेळी संघटनेचे राज्य सचिव   विलास साळवी,खजिनदार प्रकाश  लसणे,राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी,सदस्य शरद गोडांबे,नंदुरबार चौधरी, मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटना अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बधाले, सचिन  आवटे,उत्तम शिंदे यांच्यासह राज्याच्या विविध भागातुन आलेले जिल्हा  प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री खामकर  म्हणाले  राज्यातील कांही  ग्रामपंचायतीनी पोल्ट्री फार्मरांना अवास्तव आणी अवाजवी घरपट्टी आकारणी केलेली आहे. ती ताबडतोब  रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.तर शेतीला ज्यादराने विजेची आकारणी केली त्याच दराने  पोल्ट्री शेडला वीजबील आकारणी करावी.अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पोल्ट्रीफार्मर हे काही कंपन्या बरोबर करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत.अशावेळी कंपन्या शेतकरी बांधवाची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक व फसवणूक करीत आहेत.अशा कंपन्या विरुद्ध संघटना  फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा श्री खामकर यांनी दिला.
यावेळी संस्थेचे सचिव साळवी व राज्यातून आलेल्या पदाधिकारी यांनी  मार्गदर्शन केले. तर मावळ तालुक्याचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी  आभार (Talegaon Dabhade) मानले.
———————————————————————————————————————————————————————————————————————
पोल्ट्री  व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक  करणाऱ्या  कंपन्यावर संघटनेच्या वतीने  फौजदारी गुन्हे दाखल करणार – अनिल खामकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशन  संघटना
———————————————————————————————————————————————————————————————————————

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.