Maval : शिवणे येथील संत तुकाराम विद्यालयात सायकल वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पवन मावळातील (Maval) शिवणे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संचलित श्री संत तुकाराम या शाळेमध्ये गरजू मुलींना सायकल वाटप केले. तसेच इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

शाळेमध्ये एकूण 240 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये डोणे, थुगाव, मळवंडी, शिवणे, पिंपळखुटे, सडवली अशा दूरच्या गावावरून विद्यार्थी पायपीट करत येतात. ही गरज ओळखून हरबिंजर सिस्टीम कंपनीच्या संयुक्त विद्यमाने चाळीस गरजू मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्ष विद्यालयाने कायम ठेवली आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर यांनी केले. हरबिंजर कंपनीचे सिनिअर डायरेक्टर अधिराज गाडगीळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष संदीप काकडे माजी सभापती एकनाथराव टिळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे व कंपनीचे (Maval) मल्हार मोघे प्रॉडक्ट मॅनेजर, प्राची दुगल फायनान्स आणि लिगल मॅनेजर मयूर शेवते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप काकडे होते. माजी सभापती एकनाथ टिळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रविंद्र शेळके यांनी केले. मनोहर खुने यांनी आभार मानले.

Chinchwad : ‘वन्स मोअर’च्या जल्लोषात रंगला ‘पंचम दा’ यांच्या गाण्याचा कार्यक्रम; रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.