Chinchwad : ‘वन्स मोअर’च्या जल्लोषात रंगला ‘पंचम दा’ यांच्या गाण्याचा कार्यक्रम; रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात (Chinchwad) देखील एक ‘इन्ट्रुमेंटल शो’ यशस्वी करुन दाखवण्याचे स्वप्न प्रशांत साळवी यांनी व त्यांच्या ‘आलाप एन्टरटेन्मेंट एन्ड इव्हेन्टस’ने पाहिले; जे ‘वन्स मोअर’ या जल्लोषात पूर्ण देखील झाले. आर.डी. बर्मन म्हणजे पंचम दा यांच्या 84 व्या वाढदिवसा निमित्त ‘आलाप एन्टरटेन्मेंट एन्ड इव्हेन्टस’तर्फे 17 जून रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात गाण्याच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संगीत क्षेत्रातील 3 दिग्गज कलाकार त्यांनी निवडले. प्रसिद्ध अकॉर्डिंयन वादक सुराज साठे काका, प्रसिद्ध मेंडोलियन वादक प्रदिप्तो सेन गुप्ता, प्रसिद्ध व्हायलीन वादक श्रुती भावे – चितळे यांनी ही अजराअमर गीते सादर केली. ज्यामध्ये मिहीर भडकमकर, चिंतन मोढा, अमन सय्यद, विजू मूर्ती , विशाल थेलकर, बाबा खान, दीपक काळे, नितीन शिंदे, हर्षद गणबोटे, विक्रम भट, अभिजित भदे यांनी साथसंगत दिली. रात्री नऊ वाजता सुरु झालेला कार्यक्रम वन्स मोअरच्या फर्माईशमुळे मध्यरात्री पावणे एकपर्यंत चालला. यावेळी पंचम दाच्या 84 वाढदिवसाच्या निमित्ताने 1 हजार केक्स सर्व फॅन्सला वाटण्यात आले.

साऊंडसाठी गौतम साऊंडचे राजरत्न पवार यांनी सहकार्य केले, तर टेक्निकल टीममध्ये व्हिडिओ शूट आणि फोटोग्राफी व्हिवाना स्टुडिओचे रिचर्ड गजभिव यांनी जबाबदारी घेतली होती. एल इ डी डिस्प्ले ओंकार यांनी छान पद्धतीने केली. बॅकड्रॉप आणि रंगमंच व्यवस्थापनची जबाबदारी रंजीत यांनी खूप उत्तमरित्या पार पाडली. तर (Chinchwad) सुशील शिरसाठ याने डिझाईन, प्रमोशन, बॅक ऑफिस वर्क, सर्व कामे पाहिली. तसेच, 2 गाण्यांसाठी कोरस देत स्वरालाप टीमने सहकार्य केले.

यावेळेस आलापच्या लीना साळवी, स्मिता बोकील, सुनिल भावसार, प्रशांत बरीदे, राजेश कांडर अभिजित बोकील, श्याम सीसोदे यांनी मेहनत घेतली, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊ साहेब भोईर यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप म्हणून गौरव क्रियेशन के एम एंटरटेनमेंट ऍड अयुब, एम टेक इंजिनीरिंग (मनीष कोल्हटकर व मंदार), साई पॅक्स (दिपन समर्थ ), आराध्य इव्हेंट (सुधीर खोत) यांनी आर्थिक मदत केली.

फूड पार्टनर म्हणून दि रि – ट्रीट बेकर्स (राऊत फॅमिली), कामिनी हॉटेल (शेट्टी) यांनी तर मिडीया पार्टनर म्हणून एमपीसी न्यूज या वेब पोर्टलने व रेडिओ पार्टनर (95 बिग एफ एम, आर जे बंडया) यांनी काम पाहिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील या उदंड प्रतिसादाला पाहून लवकरच आलाप एंटरटेनमेंट आणखी एक नवीन थिम घेऊन  येणार आहेत.

 

Nigdi : दुर्गा टेकडीवरील चंदनाच्या झाडांची तस्करी?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.