Maval : रोटरी सिटीच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षार्थींना पुस्तक संच वाटप

एमपीसी न्यूज – कार्ला मावळ (Maval) येथील श्री एकविरा विद्या मंदिर या शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने या शाळेतील विद्यार्थ्यांना समारंभ पूर्वक पुस्तक संच प्रदान केले. तसेच या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बिट्स कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत संगणकीय कलचाचणी शिबिर घेतले.

Junnar : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

कार्ला मावळ येथील श्री एकविरा विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले जातात व गेली सात वर्ष या शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये येतात. शेतमजूर, वीट कामगार,पॉलिहाऊस कामगार,आदिवासी व अत्यंत उत्पन्न कमी असणाऱ्या समाजातील घटकांची मुले NMMS परीक्षेला बसतात व प्रत्येक वर्षी मेरिटमध्ये येतात याचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने या शाळेतील विद्यार्थ्यांना समारंभ पूर्वक पुस्तक संच प्रदान केले. तसेच या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बिट्स कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत संगणकीय कलचाचणी शिबिर घेतले.

रोटरी सिटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करते.एकविरा विद्यालयातील विद्यार्थी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येतात ही बाब अतिशय भूषणावह आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.सुरेश शेंडे यांनी करताना रोटरीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला.

विद्यार्थीदशेत स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे यांनी विशद करताना विद्यार्थ्यांना रोटरी सिटी क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली.

शालेय समिती अध्यक्ष गोपाळे गुरुजी यांनी शाळेचा व संस्थेचा इतिहास सांगताना विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शाळा करत असलेले प्रयत्न मनोगताद्वारे विशद केले. बिट्स कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या कविता खोल्लम यांनी विद्यार्थ्यांना संगणकीय कल‌ चाचणीचे महत्त्व मनोगताद्वारे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी रो.भगवान शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शिष्यवृत्ती मार्गदर्शक उमेश इंगुळकर यांनी केले. प्राचार्य संजय वंजारे व ज्येष्ठ अध्यापिका रेखा भेगडे यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केले.

प्रकल्प प्रमुख रो.रघुनाथ कश्यप, रो.मधुकर गुरव,रो.रामनाथ कलावडे, सी.ए.खोल्लम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्राचार्य संजय वंजारे यांनी आभार मानले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे मेंबर्स, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.