Talegaon Dabhade : रोटरी सिटीने साजरी केली आदिवासी बांधवांसोबत दिवाळी

एमपीसी न्यूज – राजगुरुनगर तालुक्यातील भामा आसखेड धरण (Talegaon Dabhade ) परिसरालगत शिवे-वहागावाच्या शेजारील वनदेवाच्या डोंगरातील घनदाट जंगलात असलेल्या आदिवासी पाड्यावर रोटरी सिटीने दिवाळी साजरी केली. पाड्यावरील सर्व कुटुंबीयांना कपडे, उबदार कपडे, ब्लँकेट अशा वस्तूंसह मिठाईचे वाटप करण्यात आले. येथील आदिवासी लोकांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन रोटरी सिटीच्या वतीने देण्यात आले.

Bhagwan Maharaj Kokre : 12 व्या दिवशी भगवान महाराज कोकरे यांचे उपोषण स्थगित

राजगुरुनगर तालुक्यातील भामा आसखेड धरण परिसरालगत शिवे-वहागावाच्या शेजारील वनदेवाच्या डोंगरातील किर्र जंगलात अतिशय दुर्गम परिस्थितीत आदिवासी बांधवांच्या पंचवीस कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या पाड्यावर, तिथे रस्ता, लाईट,पाणी अशी कोणतीही सुविधा नाही.

सर्व बाजूने डोंगर व घनदाट वनराई असून दीडशे लोकांचे वास्तव्य असलेल्या ह्या अतिदुर्गम भागात रोटरी सिटीने जाऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीची दिवाळी साजरी केली.150 लोकांमध्ये पुरुषांना व लहान मुलांना व मुलींना कपडे, स्त्रियांना साड्या,थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक कुटुंबाला दोन स्वेटर, ब्लॅंकेट्स इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.सर्व कुटुंबांना दिवाळीची गोड मिठाई देऊन रोटरी सिटीच्या 25 सदस्यांनी समाजामध्ये एक वेगळा संदेश दिला.

समाजातील गोरगरीब जनतेसाठी आपण पुढाकार घेऊन त्यांना यथाशक्ती मदत केली तर त्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असे रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी सांगताना आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

अशा भागातील गोरगरीब लोकांना आपण सर्वतोपरी मदत करू त्यांच्या फमुला मुलींची सामुदायिक सोहळ्यात मोफत लग्न लावून देऊ असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले तर क्लब ट्रेनर दिलीप पारेख यांनी या बांधवांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी रोटरी क्लब नेहमी अग्रेसर राहील असे विशद करताना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.जेष्ठ सदस्य सुरेश धोत्रे,सेक्रेटरी भगवान शिंदे,संजय मेहता,नितीन शहा, प्रकल्प प्रमुख शरयू देवळे यांनी  मनोगताद्वारे दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष किरण ओसवाल यांनी मानले.आदिवासी बांधवांच्या महिला भगिनींनी सर्वांचे भावपूर्ण वातावरणात आभार मानले.

रो.रामनाथ कलावडे,रो.रघुनाथ कश्यप,रो.विश्वास कदम,रो.तानाजी मराठे,रो.नवनाथ म्हसे,रो.बाळासाहेब चव्हाण,रो.दशरथ ढमढेरे,रो.मधुकर गुरव,रो.बसाप्पा‌ भंडारी,रो.वर्षा खारगे,रो.रिजवाना शेख यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम (Talegaon Dabhade ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.