Maval : सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सेवा मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदणी

एमपीसी न्यूज – फिल्ड ऍम्युनिशन डेपो, पुणे यांनी निवडणूक आयोग, मावळ (Maval) यांच्या सहकार्याने 10 आणि 11 मे 2023 रोजी ‘मतदार ओळख मेळाव्या’चे यशस्वी आयोजन केले. सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांची नवे मतदार म्हणून नोंदणी करण्याच्या उद्देशाने हे शिबीर घेण्यात आले.

पुणे केंद्रात नुकत्याच बदली झालेल्या व्यक्तींचा समावेश करून त्यांना सेवा मतदार म्हणून मतदान करण्याची आणि लोकशाही प्रक्रियेचा एक भाग बनण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सेवा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लघु मतदार यादी पुनर्रचना मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Talegaon Dabhade : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे लहान मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर

देहूरोडच्या स्टेशन कमांडरच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान दर्जेदार प्रशिक्षण दिल्याबद्दल तसेच लोकांना प्रेरक व्हिडिओ आणि चित्रफितीद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीची संकल्पना समजावून सांगितल्याबद्दल त्यांनी फील्ड अॅम्युनिशन डेपोचे कौतुक केले.

सर्व श्रेणीतील जवानांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून (Maval) मिळालेल्या उत्साही प्रतिसादाची त्यांनी प्रशंसा केली. यामध्ये 973 व्यक्तींनी नवीन मतदार म्हणून यशस्वीरित्या नोंदणी केली आणि आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 452 मतदारांची ओळखपत्रे हस्तांतरित करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.