BNR-HDR-TOP-Mobile

Maval : नातवाच्या प्रचारासाठी आजोबा मैदानात; शरद पवार यांची उद्या चिंचवडमध्ये सभा

पार्थ पवार यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ यांच्या प्रचारासाठी आजोबा मैदानात उरतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या (रविवारी) मावळ मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा, विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

नातू पार्थ यांच्यासाठी शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी पार्थ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने प्रचाराची तयारी सुरु केली आहे. नातवाच्या प्रचाराचा नारळ आजोबा फोडणार आहेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची पहिलीच सभा उद्या होणार आहे. घरातील उमेदवार असल्याने पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे स्वत: शरद पवार हेच प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.