Maval : शासन आपल्या दारी उपक्रम तालुक्यातील प्रत्येक गणात घ्यावा

महाविकास आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम तालुक्यातील पंचायत समितीच्या (Maval) प्रत्येक गण स्तरावर घेण्यात यावा, अशी मागणी मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता यावा. तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना गण स्तरावर पोहोचणे सोयीचे होणार असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी मावळ काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष(शरद पवार गट)दत्तात्रय पडवळ,तालुका शिवसेना अध्यक्ष आशिष ठोंबरे,काँग्रेसचे उपाध्यक्ष राजीव फलके आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune : कलम आणि कवच हा संरक्षण विषयक साहित्य महोत्सव संपन्न

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील शेवटच्या टोकातील नागरिकांना याचा फायदा व्हावा व प्रवास खर्च व वेळेची बचत होईल तसेच मावळ तालुक्यात दि 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे घेण्यात येणार असून,कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वडगाव येथे येण्यासाठी प्रवास लांब आहे. त्यांना येथे येण्यास अडचणीचे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

यामध्ये नागरिकांचा प्रवास खर्च व वेळेचा अपव्यय होईल तसेच वृद्ध नागरिकांना वडगाव मावळ येथे येणे त्रासाचे ठरणार असल्याचे मावळ काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट)अध्यक्ष दत्तात्रय पडवळ,शिवसेना तालुका अध्यक्ष आशिष ठोंबरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच ‘ शासन आपल्या दारी ‘ हा कार्यक्रम पंचायत समिती गण स्तरावर वरच घ्यावा, न घेतल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला (Maval) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.