Pune news: आठवी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : आकांक्षाचे रौप्य झाले सुवर्ण तर श्रावणी परिटचे झाले रौप्य

एमपीसी न्यूज: महाराष्ट्राच्या सिध्देश घोरपडेने व सिध्दि शिर्केने अनुक्रमे क्रॉसकंट्री ऑलिम्पिक व वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात आव्हानात्मक ट्रॅकवर जिगरबाज कामगिरीचे प्रदर्शन करून 18 व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. सदरहू स्पर्धा सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आयोजित केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 वी संजीवन समाधी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.

महाराष्ट्रच्या सिध्देश घोरपडेने 10 किलो मीटर क्रॉसकंट्री प्रकारात 25 मिनिट 09.917सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. लडाखच्या तेसवांग नारबोला (25मि. 33.235 सें.), व कनॉटकच्या अरमान दुयेला (25मि. 37.035 सें.) अनुक्रम रौप्य व कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या सब-ज्युनियर मुलींच्या गटात वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्रच्या सिध्दी शिर्केने 10 किलो मीटर डोंगर दऱ्यातील आव्हानात्मक मार्ग 29 मिनिट 50.39 सेकंदा पार करून सुवर्ण पदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. या प्रकारात कर्नाटकच्या केरन मार्शलने 35 मि. 29.609 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य आणि केरनच्याच संघाच्या नागासीरी एच. एन. ने 36 मि. 47.955 सेकंदात अंंतर पूर्ण करून कास्य पदक जिंकले.
महाराष्ट्र संघाच्या खात्यात आता तीन सुवर्णपदके आहेत.

सविस्तर निकाल पुढिल प्रमाणे :
एलिट पुरूष – क्रॉसकंट्री ऑलिम्पिक (30 किलो मीटर) : खारीकसिंग अ‍ॅडॉन्स (मणिपूर, 1 तास 12 मिनिट 44.910सें.), रियात राय (पश्चिम बंगाल 1 तास 14 मि. 03.035 सें.), सोनम नारबो (लडाख, 1तास 14मि. 200 सें.); ज्युनियर मुले – वैयक्तिक टाईम ट्रायल (२० किलो मीटर) : चरिथगौडा (कर्नाटक,59मि. 08.61 सें.), समरन सबभाईल ए. के. (कर्नाटक, 1 तास 03 मि. 28.686 सें.), सुधांशू लिंबू (पश्चिम बंगाल, 1 तास ०4मि. 17.655सें.); सब-ज्युनियर मुली- वैयक्तिक टाईम ट्रायल (10 कि. मी.) : सिध्दि शिर्के ( महाराष्ट्र 29 मि. 50.39 सें.), केरन मार्शल (कर्नाटक, 35 मि. 29.607सें.), नागासीरी एच. एन. (कर्नाटक, 37 मि. 47.955 सें.); युथ मुले – क्रॉसकंट्री ऑलिम्पिक (10 कि. मी.) : सिध्देश घोरपडे ( महाराष्ट्र ,25मि. 09. 917 सें.), तेसवांग नारबो (लडाख, 25 मि. 33.235 सें.), अरमान दुये (कर्नाटक, 25 मि. 37.035 सें.)

युथ मुली – वैयक्तिक टाईम ट्रायल 10 कि. मी. (शुक्रवारचा बदललेला निकाल) : आकांशा म्हेत्रे ( महाराष्ट्र, 29 मि. 52.997 सें.), श्रावणी परिट ( महाराष्ट्र , 30 मि. 03.167 सें.), अवनी दरियाल (उत्तराखंड, 33 मि. 01.591 सें.), या प्रकारात गायत्री कित्तूर (कर्नाटक 25 मि. 03. 279 से.) या सायकलपटूला बाद करण्यात आले.

आकांक्षाचे रौप्य झाले सुवर्ण तर श्रावणीचे कास्य झाले रौप्य ..
शुक्रवारी झालेल्या युथ मुलींंच्या 10 कि. मी. वैयक्तीक टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या आकांक्षा म्हेत्रेला रौप्य तर श्रावणी परिटला कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु, महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापकांनी तांत्रिक कारणाच्या जोरावर कर्नाटकची सायकलपटू गायत्री कित्तूरविरूध्द आक्षेप नोंदविला होता. त्या आक्षेपाची पडताळणी फेडरेशनच्या तांत्रिक समितीने केल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर आकांक्षाचे रौप्य सुवर्णात तर श्रावणीचे कास्य रौप्यपदकात बदलण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.