Metro found Fossils under Mandai : ‘ते’ जीवाश्म दोन भव्य प्राण्यांचे : पुरातत्व संशोधकांचा दावा

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोच्या भुमीगत मार्गिकेसाठी खोदकाम सुरू आहे. यावेळी मंडई परिसरात खोदकामांमध्ये मोठ्या प्राण्यांच्या हाडांचे जीवाश्म सापडल्यामुळे संपुर्ण शहरात चर्चा रंगली होती.

डेक्कन कॉलेज ऑफ आर्किऑलॉजीच्या पुरातत्व संशोधकांनी काल घटनास्थळी भेट घेतली. जीवाश्मांची पाहणी करून दोन प्राण्यांची हाडे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

संशोधकांच्या मते हे जीवाश्म हत्ती आणि अन्य एखादा मोठ्या प्राण्याचे असण्याची शक्यता आहे. या हाडांचे रुपांतर हळूहळू जीवाश्मांमध्ये आहे. खोदकाम करताना ज्या अंतरावर हे सापडले आहे त्यानुसार हे किमान 200 ते 300 वर्षे जुने असावे असा अंदाज आहे. ही जीवाश्म नेमकी कोणत्या प्राण्यांची, शिवकालीन की पेशवेकालीन, नेमका कार्यकाळ कुठला हे जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत शास्त्रीय अभ्यासाअंती तथ्य सापडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

तुर्तास हे जीवाश्म ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या जीवाश्माचे नेमके गूढ काय याची पुणेकरांसह सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.