Chinchwad Crime : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 307 जणांवर पोलिसांकडून कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 307 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 26) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी एकाच दिवसात 231 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आजपर्यंत 91 हजार 515 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 876 रुग्ण सध्या सक्रिय आहेत. तर गुरुवारी 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 19 मार्च ते 24 नोव्हेंबर या कोरोनाच्या काळात 15 हजार 649 जणांवर विनामास्कची कारवाई केली. तर 893 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. 60 हजार 994 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. नियमभंग करणा-यांकडून 87 लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (38), भोसरी (13), पिंपरी (87), चिंचवड (0), निगडी (48), आळंदी (0), चाकण (0), दिघी (14), म्हाळुंगे चौकी (23), सांगवी (65), वाकड (19), हिंजवडी (0), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.