Metro : मेट्रो स्टेशन पासून असे असेल रिक्षा भाडे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केले दर

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोच्या 18 स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी ( Metro ) भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी जाहीर केले. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांना केले आहे. घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना शेअर रिक्षा उपयुक्त ठरणार आहे.

Mahavitran : पश्चिम महाराष्ट्रात वीज ग्राहकांकडे सुरक्षा ठेवीची थकबाकी 2 हजार 352  कोटींवर, वीजपुरवठा खंडित

शेअर रिक्षाचे भाडे ठरविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन, बघतोय रिक्षावाला, शिवनेरी, आप रिक्षा संघटना, सावकाश संघटना, आझाद हिंद संघटना आदी विविध संघटनांची तीन वेळा बैठक घेतली होती. तसेच दोन्ही शहरांत सर्वेक्षण केले. त्यानंतर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेअर रिक्षाचे भाडे निश्चित केले, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

असे असेल शेअर रिक्षाचे भाडे

 

दोन्ही शहरांत मेट्रोची 18 स्थानके आहेत. त्यातील बहुतेक स्थानकांच्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात शेअर रिक्षा धावणार ( Metro ) आहे. पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकापासून 10 किलोमीटरच्या परिसरात शेअर रिक्षाची वाहतूक होईल. ‘प्रवासी आणि चालक, या दोन्ही घटकांना शेअर रिक्षा फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी पोलिसांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे,’ असे रिक्षा पंचायतीचे तर्फे मत मांडण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.