Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात, एकाचा मृत्यू 5 जखमी

एमपीसी न्यूज – कात्रज-कोंढवा रस्त्यावर आज (दि. 10) सकाळी नऊ ( Pune ) वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.

Metro : मेट्रो स्टेशन पासून असे असेल रिक्षा भाडे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केले दर

काही शाळकरी मुलांना किरकोळ जखमा झाल्या. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कोंढवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. जखमींना भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातामध्ये आठ ते दहा गाड्यांचे नुकसान झाले.पावसाळी सिमेंट पाईप वाहतूक करणाऱ्या (एमएच 14 जेडी 6919 ) गाडीचा ब्रेक फेल झाला. ती गाडी समोर असणाऱ्या टेम्पोला धडकली.

टेम्पो कार आणि दोन दुचाकींना धडकल्यानंतर शाळेच्या गाडीला जाऊन धडकला. पुढे असणाऱ्या शाळेच्या बसची हायवा ट्रकला धडक बसल्याने विद्यार्थ्यांना दुखापत झाली .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कृष्णा चौरे (वय43, रा. धनकवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अपघातामुळे एका बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून त्या स्माशानभूमीपासून कात्रज चौकापर्यंत असल्याने पूर्णपणे वाहतूककोंडी झाली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.