Pune : संभाजी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी, तुषार गांधी यांची डेक्कन पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसापूर्वी श्री शिवप्रतिष्ठान (Pune) हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

यावेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी, अँड असीम सरोदे, अन्वर राजन हे देखील उपस्थित होते.

यावेळी तुषार गांधी म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधान केली आहे.

त्याच दरम्यान महात्मा गांधी यांच्याबद्दल देखील विधाने केली. पण आता महात्मा गांधी यांच्या आईबद्दल विधान केले. ते ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे.

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात, एकाचा मृत्यू 5 जखमी

त्यानंतर राज्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे विरोधात गुन्हे दाखल झाले. त्यावर आम्ही या प्रकरणी कडक पावलं उचलू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, संभाजी भिडे यांच्या विधानाला (Pune) महिनाभराचा कालावधी होऊन गेला. तर विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन देऊन साधारणपणे 15 दिवसांचा कालावधी झाला आहे. तरी देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.

त्यामुळे आम्ही आज डेक्कन पोलिसांकडे संभाजी भिडे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अन्यथा आम्ही न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पण एकच वाटत की, त्यांचे पाय का बांधुन ठेवले आहेत आणि कोणी बांधुन ठेवली आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत राज्य सरकार विरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.